Wednesday, June 11, 2008

shivdharma prakatan at jijau srishti,sindkhed raja


शिवधर्म प्रकटन भूमिका
माझ्या भावंडांनो,
मी प्रथम आपलं स्फुर्तिस्थान असलेल्या जिजाऊंना जयंती दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. जिजाऊंना प्रेरणास्वरूप मानून धर्मचिंतनाच्या क्षेत्रात गेली काही वर्ष आपण जी वाटचाल करत आलो आहोत,ती आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे.युगायुगांची ओझी आता गळून पडत आहेत. श्वास मोकळे होऊ लागलेत. पंख बळकट होऊ लागलेत. निर्भयपणे झेपावण्यासाठी विशाल आकाश खुणाऊ लागलं आहे.मुख्य म्हणजे आपण आता स्वातंत्र्याची चव चाखली आहे.एक्दा ती चव चाखल्यावर आता पारतंत्र्याचा एक इवलासा बिंदूही सहन होणार नाही,अशी जिभेची अवस्था झाली आहे.आता आपल्याला स्वातंत्र्याची अशी भूक लागली आहे, की ती आता एक-दोन घासांनी भागणार नाही. खरं तर त्या एक दोन घासांनी ती अधिक प्रज्वलितच झाली आहे आणि ती पुर्णपणे भागून तृप्त होण्यासाठी आपण सर्व जण कमालीचे उताविळ झालो आहोत.
आत्मभान येऊ लागलं,हे मोठं यश
हे जे काही घडलं आहे आणि घडत आहे.ते आओअल्या सर्वांना आनंदात भिजवून टाकणारं आहे. आपल्याला आत्मभान येऊ लागलं आहे, आपल्या अस्तित्वाचा अर्थ कळू लागला आहे,हे आपल्या वाटचालीचं मोठं यश आहे.आपण यथार्थ अभिमान बाळगावा,समाधान मानावं, कृतार्थता अनुभवावी,असं बरंच काही आता घडलं आहे, यात शंका नाही.
टीका आणि सूचना करणारांविषयी कृतज्ञ राहू या
आपलं हे सगळं यश कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असलं तरी अल्पसंतृष्ट होऊन विश्रांती घेता येईल अशी स्थिती नाही.आपल्यापुढचं काम फार अवघड आहेऽजून खूप प्रवास बाकी आहे.आपण जे पाऊल उचललं आहे, त्याविषयी समाजातील असंख्य लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही मोजक्या व्यक्तींनी दृष्टाव्यानं अर्थहीन, निराधार आणी विध्वंसक टीका केली,हे खरं आहे. पण आपण त्यांच्यावरही रोष धरण्याऐवजी त्यांचेही आभार मानू या. त्यांच्या या टिकेमुळं आपल्याला आपलं काम अधिकाधिक निर्दोष आणि परिपुर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ज्यांनी आपल्याला अधिक डोळस होण्याचा मर्ग अशा रीतीनं दाखवला , त्यांच्याविषयी आपण कृतज्ञच असायला हवं. शिवाय,उद्याच्या काळातील आपलं शिवाचरण, हेच त्यांच्या विघातक टीकेचं प्रभावी उत्तर असेल. या मोजक्या व्यक्ती वगळता इतर असंख्य असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया तर प्रामान्णिकपणाच्या आणि व्यापक समाजहिताचा सद्हेतू बाळगून दिलेल्या आहेत. त्यांच्या या प्रतिसादानं आपल्या धर्मचिंतनाची व्याप्ती, खोली आणि उंची वाढायला मदत झाली आहे. त्यांची आभार कोणत्या शब्दांत मानावेत, हे मला सनजत नाही. त्या सर्वांपर्यंत व्यक्तिगत स्वरुपात आपली कृतज्ञता पोचवणं व्यावहारिक दृष्ट्या शक्य झालं नसलं तरी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या क्षणी जाहीररित्या त्यांना सांगू इच्छितो,की ते सर्वजन आमच्या काळजाचाच एक भाग बनून गेले आहेत.एवढ्या प्रास्ताविकानंतर मी शिवधर्माच्या स्वरुपाविषयी काही महत्त्वाच्या बाबी आपल्यापुढं ठेवू इच्छितो.
धर्म ही अत्यंत गंभीर बाब
धर्म ही अत्यंत, अत्यंत आणि अगदी अत्यंत गंभीर बाब आहे आणि आपण त्याच गांभिर्यानं तिच्याकदं पाहिलं पाहिजे.खरा धर्म म्हणजे एखाददुसऱ्या वेळेची भूक भागवणारं भोजन नव्हे. चार-दोन तासांचा सुखद पोरखेळ नव्हे. एखाद्या विद्वानाचं व्यासंगी पांडित्य नव्हे.एखाद्या वक्त्याचं प्रभावी वक्तृत्व नव्हे. एखाद्या साहित्यिकाचा प्रभावी ग्रंथ नव्हे. एखाद्या राजकारण्याचं तात्कालिक सत्ताकारण नव्हे. एखाद्या प्रयत्नवादी माणासाचा एखाद्या पिढीपर्यंत टिकणारा अवखळ हट्ट नव्हे. एखाद्या समर्पणशील जनसमुहाचं अधुरं स्वप्न नव्हे. खऱ्याखुऱ्या धर्मामध्ये हे सगळं आणि यासाअखं बरंच काही कमी जास्त प्रमाणात आणि पूर्ण-अपूर्ण स्वरूपात असू शकतं आणि तरी देखील खऱ्याखुऱ्या धर्माचं सुस्पष्ट दर्शन घडण्यासाठी आपल्याला अजोन खूप काही समजून घेण्याची आवशक्यता आहे. शिवधर्म ही केवळ आज इथे जमलेल्या आपल्या काअही लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी स्थलकालबद्ध वा व्यक्तिमर्यादित घटना नाही. ती आपल्या असंख्य भावी पिढ्यांना जणू काही त्यांच्या अस्तित्वाचा सांस्कृतिक गाभा आणि त्यांच्या आचार-विचारांचं नैतिक अधिष्ठान देणारी, सर्व प्रकारच्या नकारात्मक मर्यादांच्या पलिकडे जाणारी पवित्र आणि पावक अशी जीवनशैली असणार आहे.
भूक कडाडून लागली, तरी अन्न शिजेपर्यंत कळ काढलीच पाहिजे
धर्म ही असा दूरगामी परिणाम करणारी गोष्ट असल्यामुळं आपण तिला जास्तीत जास्त परिपुर्ण बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. लोकांनी केलेल्या सुचनांची गांभिर्यानं दखल तर घ्यायचीच, पण ज्यांच्याकदून सुचना आल्या नाहीत त्याच्याशीही संवाद निर्माण करून आप्ल्या कार्याला अधिक परिपुर्ण करायचं, हा मार्ग स्विकारणं भाग आहे. आपल्या उत्साहाच्या उर्मी दाबुनही टाकायच्या नाहीत आणि गैरवाजवी उताविळपणा करून अधांतरी लटकायचंही नाही. भूक कितीही कडाडून लागली असली तरी अन्न नीट शिजेपर्यंत कळ काढायलाच हवी. अनाठाई घाई करून अर्धंकच्च अन्न खाल्लं तर ते पोषक ठरण्या ऐवजी प्रकृती बिघडवू शकतं. अन्न घाईघाईनं शिजवण्यासाठी जास्त काळ लावला तर ते करपू शकतं आणि तेही आपल्या हिताचं ठरत नाही. हा केवळ कल्पनाविलास नाही. हे कठोर वास्तव आहे. म्हणूनच आपल्याला अत्यंत सावधपणानं पावलं टाकण्याची गरज आहे. जी घटना भूतकाळातील असंख्य पिढ्यांची गुलामगिरी नष्ट करणारी आहे आणि भविष्यकाळातील असंख्य पिढ्यांचं कल्याण करणारी ठरेल असा आपला विश्वास आहे, ती घटना घडवतांना संयम ठेवल्यामुळं बिघडत तर काहीच नाही, उलट अधिक चांगलं घडवण्याचा वाव मिळतो. युगायुगांना प्रभावित करणाऱ्या निर्मितीचं स्वप्न पाहताना चार-दोन वर्षांचा काळ एका क्षणाएवढाही दीर्घ नाही,हे शांतपणे समजून घेणं अगदी अपरिहार्य आहे.
हा शिवधर्म प्रकटनाचा सोहळा
आपल्या भावी प्रवासाच प्रदीर्घ मार्ग जर आपण लख्खपणानं आपल्या नजरेसमोर आणला, तर इथून पुढची तीन वर्ष म्हणजे एक त्रिवर्षात्मक क्षण आहे,असं मानू या. तुळजापूरच्या पहिल्या शिवधर्म परिषदेच्या रूपानं आपण एक धर्मवेल लावली आहे. आज इथं जिजाऊंच्या जयंतीदिनी आणी त्यंच्या जन्मस्थानी त्या वेलीवर एक टपोरी कळी आली असून नेमकी या क्षणी ती उमलू लागली आहे. आत्ताच क्षण हा त्या कळीच्या उमलण्याचा प्रारंभबिंदू आहे. येत्या सुमारे तीन वर्षात आपल्या अथक प्रयत्नांमुळे ती कळी उमलण्याची प्रक्रिया पुर्ण होईल आणि तो त्या प्रक्रियेचा समाप्तिबिंबू असेल. त्या समाप्तिबिंबूनंतर आपण परिपुर्ण शिवधर्मी होणार आहोत. तोपर्यंतचा काळ हा शिवधर्माचं स्वरूप अधिक सुस्प्ष्टपणे समजून घेण्याच, आपल्या अंगी शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक ती पात्रता प्राप्त करण्यासाठी साधना कर्ण्याचा आणि आपल्या भूमिकेच्या संदर्भात जास्तीत जास्त लोकांशी हार्दिक संवाद साधण्याचा काळ आहे, हे ध्यानात घेऊन आपण आजपासूनच या कार्याला वाहून घेऊ या. याचा अर्थ या क्षणी चालू असलेला हा स्वतंत्र्योत्सव येती सुमारे तीन वर्ष अखंडपणे चलू राहील असं मानू या आणि आजचा हा उत्सव शिवधर्म प्रकटनाचा सोहळा म्हणून आपल्या अंतरंगात, आपल्या रोमरोमात साठवून ठेऊ या. हे कार्य आपण पिढ्या-न्-पिढ्या करीत राहू या‌हिवधर्माच्या स्वरूपाविषयी काही मांडणी प्राथमिक आचारसंहितेच्या आणि इतर माध्यांतून आपल्यापुढे आली आहे आणि तिच्या आधारे आपण काही प्रमाणात वाटचालही सुरू केली आहे. अधिक तपशीलवार मांडणी क्रमशः आपल्यापुढं येत जाईल आणी आपण चिकित्सापुर्वक, डोळसपणानं तिच्यावर चिंतन करून ती समाजापुढे ठेवाल, असा आमचा विश्वास आहे.

ही बहुजनांच्या वारशाबरोबरची बांधीलकी आहे.

आपण आजच्या हया मोहरलेल्या घट्नेला शिवधर्म प्रकटन म्हणत आहोत.याचा अर्थ आपण काळजीपूर्वक ध्यानात घ्यायला हवा.प्रक टन म्हणजे जे आधीपासून अस्थित्वात आहे ते प्रकट करने होय.अनौपचारिक पद्धतीने बोलताना आपल्यापैकी काही जनानी गेल्या कही वर्षात "शिवधर्माची स्थापना" असा शब्द प्रयोग केलेला असला, तरी आता काटेकोरपने धर्म शास्त्रीय परिभाषेत मांडणी करताना आपला महान वारसा ध्यानात घेवून आपण "स्थापन" याशब्दाऐवजी "प्रकटन" हा शब्द जाणीवपूर्वक वापरत आहोत.

हे प्रचलित अर्थाचे धर्मांतर नव्हे- हें आपल्यापासून अधर्माला अलग करने आहे.

शिवधर्म हे प्रचलित अर्थाचे धर्मांतर नव्हे ,हेही आपण ध्यानात घेऊया,एक धर्म सोडून दुसरया धर्माचा स्वीकार करणं,हे स्थूलमानानं धर्मांतराचं स्वरुप असतं ,शिवधर्म प्रकटनाचं मात्र हे स्वरुप नाही,आपण कोणत्याही एक धर्मापासून दूर होउन दुसरया धर्माचा स्वीकार करत नाही.

ईश्वर मानता की नाही हया पेक्षा माणूसपन जपता का नाही हें महत्वाचे.
पुर्वीच स्पष्ट केलं आहे,यानुसार ईश्वराचं अस्तित्व माननारे व ईश्वराचं अस्तित्व न माननारे असे सर्वजन शिवधर्मामध्ये स्नेहपूर्वक,परस्परांचा आदर करीत,आनंदानं राहू शकतात.

आधी मने निर्मल केली तर जातीव्यवस्था आपोआपच कोसलेल

आपल्या समाजातील जातिव्यवस्था हा आपल्या पुढचा मोठा गुंता आहे.मी मोकळेपणाने आणि तितक्याच प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो,की शिवधर्माजवळ अशी कोणतीही जादूची कांडी नाही,की जी क्षणार्धात हा गुंता सोडवून भारतीय समाजाला पूर्णांशाने जतिमुक्त करून टाकेल. या बाबतीत शिवधर्माची भूमिका मांडन्याचा हा प्रसंग नाही ,परंतु सूत्र रूपाने काही मुद्दे आपल्या पुढं ठेवावेत,अशी माझी भावना आहे.

स्त्रीयांविषयी बोलताना सदअभिरुचिला दाग लागता कामा नये.

देवदेवतांच्या संदर्भात काही विवेचन करायचं असेल, तर ते आधार देवून, संतुलित भाषेत,संयमानं करावं विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात काही मांडणी करायची असेल, तेंव्हा तर आपले शब्दप्रयोग अतिशय काळजीपूर्वक करावेत,

गुलामही व्हायचे नाही,उद्दामही व्हायचे नाही.
या विवेकचा अर्थ असा नाही की आपली विटम्बना करणारी मुल्य आपल्यावर लादनारया आपल्या सांस्कृतिक विरोधकांशी तडजोड़ी करून त्यांना शरण जायचं,आशा प्रकारची लाचारी वा अगतिकता शिवधर्माला अजिबात अभिप्रेत नाही,आपला संघर्ष विधायक,सर्जनशील हवा.



राज्य घट्नेचे पालन बंधनकारक.

शिवधर्म मानणारया लोकांपैकी बहुसंख्य भारताचे नागरिक असण्याची शक्यता आहे. स्वाभाविकच, भारतीय राज्यघटना त्यांना बंधनकारक असेल.



जिजाऊ हया आपल्या मानवी प्रेरणा-त्यांचे दैवतीकरण नको.


शिवधर्म प्रकटन दिन वृतांत :-
सोलापुर येथील उर्दूपत्रकार सय्यदशाह गझिउद्दीन यांच्या शब्दात....("मिली गझेट" ह्या उर्दूवर्तमान पत्रातुन)

On 12 January 2005, about a quarter of a million Marathas and Kunbis renounced the Vaidic Hindu religion and embraced a new faith called “Shivdharma.” The ceremony was held at Sindhkhed Raja in Buldana district where people converged from Maharashtra and neighbouring states in around 15000 vehicles. This truly historic occasion was totally ignored by the national print and electronic media despite the fact that the organisers of the event were publicising it and holding smaller events of the same kind since 25 August 2002. The only exception was the Lokmat Marathi newspaper (but lokmat has not given news in jalna print which is nearer to sindkhed,no need to talk about other areas). It was a great event in the on-going revolt against the Brahmanic caste system imposed on the Hindu society, especially since the unleashing of the Hindutva counter attack after Mandal.
The multitude at Sindhkhed Raja with the podium on the left
The event took place on a hillside spread over 150 acres which looked like a sea of humanity. Around 200 bookstalls sprang up at the place and most were selling books against Brahmanism written by Mahatma Jyoti Phule,dr.babasaheb Ambedkar, M M Deshmukh, dr.a.h.Salunkhe, Purushottam Khedekar,shrimant Kokate,jaimini Kadu,prabhakar Pawde and others. These authors had a role in the outcome on that day at Sindhkhed Raja birthplace of Jijau, mother of Shivaji. “Shivdharma” is named after Shivaji. A Rs 110000 million project called called “Jijau Srishti” is coming up at Sindhkhed Raja to be the headquarter of the new faith whose main tenets are as follows:


Anyone who is not a Brahmin can join Shiv Dharma;
There will be no place for caste or festivals like Gudi Padwa (Maharashtrian New Year) or for rituals like Satyanarayan puja;
Shiv Jayanti will be the main festival;
The reigning deity will be Shivaji's mother, Jijabai;
Dashratra Utsav will be celebrated in memory of Jijabai and Savitribai Phule (Mahatma Phule's wife) instead of Navratri;
Savitribai, who started the first school for girls in Maharashtra, will be the deity of learning;
Instead of Diwali, a festival in the name of Bali, a just and pious king, will be celebrated;
Community weddings, anti-addiction campaigns, libraries and gymnasiums at village level will be encouraged.
Preparations for this event were on since 2002. A grand stage was built on the hillside. No important political personality was invited to the ceremony which was chaired by Dr AH Salunkhe, the mentor of the movement. Purushottam Khedekar, who is the founder of the Shiv Dharm and head of Maratha Sewa Sangh, was also present on the stage. Khedekar was the first to speak. “Today we will be free from the Brahmin Hindu dharma,” he said adding that “this day will have great importance in the movement of freeing Bahujans from mental, religious and civilisational slavery. Those who are not with us today have slavery stamped on their brains.” He said, “if need be, we will resort to a bloody revolution” and went on to proclaim that the Shiv Dharm will be free from caste, blind following and rituals. This religion will meet the challenges faced by Bahujans in the twentieth century. Now no grih (star) will harm us. Instead, our sons will reach out to stars. No Waman now will kill Bali Raja by deceit (a reference to Waman the Brahmin who killed Bali Raja of the Bahujans). No longer will we repeat the old story where Bahujans always died and Brahmins always benefitted. We will write our history ourselves, he said.Dr Salunkhe said that “the very fact that you are here means that you have regained consciousness.” He went on to say “that religion is a very serious matter which should be approached with total seriousness. Whatever step we take today, it must not be a momentary and sentimental step. It should be a well-thought-out measure and all further steps should also be taken with caution. Today’s decision is to free the coming generations from slavery. This decision is for the welfare of innumerous people of our coming generations.” Salunkhe announced that both who believe in God and those who do not, can coexist in this new religion. Even people believing in God take part in a system which exploits the masses. Such godliness is not acceptable to Shiv Dharm. Without believing in “god” we can form a healthy and clean society. Shiv Dharm rejects the idea that not believing in god means a value-less life. Dr Salunkhe said that the caste issue is a challenge for us and the new religion does not own any magic wand to destroy it in one go. We will have to continue our struggle to eradicate this evil. This will be our main duty. Speaking to the youth he said, the religious system of this country has stung us for long. This feeling produces great rage in us but the power generated by this rage will not be used for evil, rather it will be employed to create a better future and brotherhood among people. Believers in Shiv Dharm will not harm believers in other religions, he said. Dr Salunkhe has been entrusted with the responsibility to produce the literature for the new faith and to formulate its concept of a new way of life. He is a retired professor of Marathi and politics, while the brain behind the movement is Prushottam Khedekar who is an executive engineer in the PWD department of the Maharashtra government. Another important member of this movement is Netaji Gore who is an executive engineer in Sholapur’s irrigation department and works as the world coordinator of the movement.The speeches came to an end at 5.40 pm when Sonandanai of the Jijao Brigade (the ladies section of the Maratha Sewa Sangh) and Nejati Gore together read a statement and the whole congregation repeated it after them and thereby they renounced their age-old Vaidic religion and became Shiv Dharmis. Khedekar announced that 1.9 million people from Maharashtra and other states have filled forms of the new faith and thus they too have now embraced Shiv Dharma which brings the total of the believers in the new faith to 2.1 million. Khedekar added that around 15 to 20 million people are in the process of following suit. He also announced that a similar grand function will again be held at the same place on 12 January 2008. Fireworks followed and a cultural programme was held in the evening before the the new believers started returning to their towns and villages with a new resolve to evolve a caste-free society.
The above information on the Sindhkhed Raja function is summarised from a detailed report in Urdu by Syed Shah Ghaziuddin, Solapur-based advocate, who personally witnessed the event (from indian muslim's leading newspaper MILLI GAZETTE)





tags-
shivdharma ,maratha seva sangh,sambhaji brigade,jijau brigade,jijau,jijamata.jijabai,shivaji,sambhaji,maratha,purushottam khedekar,dr.a.h.salunkhe,shivdharm